मुंबई

माहिम-बांद्रा दरम्यान आज रात्री विशेष ब्लॉक; ३३४ लोकल फेऱ्या रद्द !

CD

पश्चिम रेल्वेवर ३३४ लोकल फेऱ्या रद्द
माहीम-वांद्रेदरम्यान आज-उद्या रात्रकालीन मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान नव्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार (ता.  ११) आणि शनिवारी (ता. १२) दोन टप्प्यांत रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार असून, एकूण ३३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच काही मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, काही गाड्यांची सेवा दादर, बोरिवलीपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे.
---
ब्लॉक १ : शुक्रवार
कधी :  शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत  धीम्या मार्गावर, तर  रात्री १२.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत जलद मार्गावर
परिणाम - ब्लॉकमुळे चर्चगेटहून रात्री १०.२३ नंतर सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर धावतील. त्यामुळे या काळात महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. शुक्रवारी चर्चगेटहून शेवटची धीमी लोकल भाईंदरकडे रात्री १०.२३ वाजता, तर शेवटची जलद लोकल विरारकडे रात्री ११.४० वाजता सुटेल. विरारहून शेवटची चर्चगेट लोकल रात्री १२.०५ वाजता सुटणार. गोरेगाव-वांद्रेदरम्यानची सेवा हार्बर मार्गावरून सुरू राहील. विरार-अंधेरीदरम्यान लोकल गाड्या धीम्या व जलद दोन्ही मार्गांवर चालविण्यात येणार आहेत.
शनिवारी पहाटेपासून सेवा :
- भाईंदरहून चर्चगेटसाठी पहिली धीमी लोकल सकाळी ६.१० वाजता सुटेल. ही लोकल सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गाने धावेल.
- बोरीवलीहून चर्चगेटसाठी पहिली धीमी लोकल सकाळी ८.०३ वाजता रवाना होईल.
- चर्चगेटहून बोरिवलीसाठी पहिली जलद लोकल सकाळी ६.१४ वाजता सुटेल.
- चर्चगेटहून विरारसाठी पहिली जलद लोकल सकाळी ६.१५ वाजता धावणार.
-------------
ब्लॉक २ : शनिवार  
कधी : धीम्या मार्गावर रात्री ११.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत, तर जलद मार्गावर रात्री ११.३० ते सकाळी ८ वाजेपर्यंत
परिणाम : चर्चगेट-दादरदरम्यान जलद लोकल सेवा सुरू राहील. डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल अंधेरीपर्यंत मर्यादित राहतील. चर्चगेटहून विरारसाठी शेवटची लोकल शनिवार रात्री १०.५३ वाजता सुटेल. रविवारी विरारहून चर्चगेटकडे पहिली धीमी लोकल सकाळी ८.०८ वाजता, तर भाईंदरहून सकाळी ८.२४ वाजता सुटेल. विरारहून चर्चगेटकडे पहिली जलद लोकल सकाळी ८.१८ वाजता धावेल. चर्चगेटहून विरारकडे पहिली जलद लोकल सकाळी ९.०३ वाजता रवाना होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT