मध्य रेल्वेचा पायाभूत सुविधांवर भर
विविध स्थानकांवर १४ नवे एफओबी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांवर भर दिला. विविध स्थानकांवर १४ नवे फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारून सुलभ प्रवासाचा मार्ग उपलब्ध केला आहे. यासोबतच स्थानकाचा पुनर्विकास, ट्रॅक अपग्रेडेशन, वेगवाढ, पुलांचे पुनर्वसन आणि मानवी लेव्हल क्रॉसिंग हटवण्यासारख्या कामातही रेल्वेने भरीव प्रगती केली आहे.
मध्य रेल्वेने मुंबई विभागात गोवंडी, खांडी, बदलापूर, कामण रोड; भुसावळमध्ये अंकई; नागपूरमध्ये तिगाव, पांढुर्णा, भरतवाड़ा आणि पुणे विभागात येवला, निंबलक, अकोलनेर, विळद, पाटस येथे हे पूल उभारण्यात आले. तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी वडाळा-किंग्ज सर्कल, गोवंडी-मानखुर्द आणि शहाड-आंबिवली दरम्यान उपनगरी विभागात तीन एफओबी तयार करण्यात आले आहेत.
--
स्थानकांचा पुनर्विकास
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर आणि अजनी येथे पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. २२ स्थानकांवर सुधारणा, नाशिकरोड स्थानकाच्या दर्शनी भागात सुधारणा, होटगी येथे उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म आणि खंडवा स्थानकावर नवीन प्रतीक्षालय व बुकिंग कार्यालय उभारण्यात आले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.