मुंबई

महालक्ष्मी उड्डाण पुलावर दुचाकी अपघात

CD

महालक्ष्मी उड्डाणपुलावर दुचाकी अपघात
कासा, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी अपघात झाला. चारोटीहून तलासरीकडे जात असलेल्या वरखंडे येथील वाहतूक पोलिस मधुकर घोडले यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात टँकरने जोरदार धडक दिली. धडकेमुळे घोडले यांची दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच घोटल येथील रुग्णवाहिकाचालक राजेश भोईर व त्यांचे साथीदार काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी घोडले यांना तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर अज्ञात टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT