मुंबई

फरार आरोपीला उत्तरप्रदेश येथून अटक

CD

हत्येच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला अटक

भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून पाच वर्षांपूर्वी भिवंडीत सत्तार मन्सुरी यांची गोळ्या घालून हत्या करणारा गुन्ह्यातील फरारी आरोपी साजन ऊर्फ बाबर मुमताज अहमद मन्सुरी याला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात शांतिनगर पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शांतिनगर परिसरातील गुलजारनगर येथे फुलपूर येथील जमिनीच्या वादातून सत्तार मन्सुरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी साजन ऊर्फ बाबर मुमताज अहमद मन्सुरी हा फरारी झाला होता. पोलिसांना साजन हा उत्तर प्रदेश राज्यातील फुलपूर, प्रयागराज येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकातील रिझवान सैय्यद, प्रशांत बर्वे, रोशन जाधव यांनी उत्तर प्रदेश येथील स्थानिक पोलिसांच्या एसटीएफ पथकातील पोलिस निरीक्षक अनिलकुमार सिंह व त्यांचे सहकारी अजयसिंह यादव, किसनचंद्र, अजय कुमार यादव, मनोजकुमार यांच्या मदतीने अटक केली. त्याला भिवंडी येथे आणून न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : जालन्यातील बदनापूर शहरात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक

Road Accident News : देवदर्शन करून परतताना काळाचा घाला! कारची लॉरीला जोराची धडक; एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT