५८ आदिवासी कुटुंबांना अखेर मिळणार न्याय!
चंद्रशेखर बावनकुळेंची सकारात्मक भूमिका
पालघर, ता. ११ (बातमीदार) ः पालघर नगर परिषद क्षेत्रातील अल्याळी नवा पाडा येथील ५८ आदिवासी भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मंत्रालयात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या कुटुंबांच्या त्याच जागेवर पुनर्वसनासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ वनखात्याच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांची घरे जमीनदोस्त करण्याबाबतचे आदेश निघाले होते. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई थांबवण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन बैठकीचे नियोजन करण्याबाबत विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत संबंधित या जमिनीवर त्यांचा वास्तविक आणि कायदेशीर हक्क निश्चित करण्यासाठी कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले. आजच्या निर्णयामुळे त्यांचा संघर्ष थांबून सन्मानाने आणि अधिकृतपणे वास्तव्याचा अधिकार मिळणार आहे. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुरणी जाखड, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय प्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटकर व इतर रहिवासी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.