

Mumbai SGNP ticket hike
ESakal
मुंबई : मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तिकीट दरात प्रस्तावित वाढ स्थगित करण्यात आली आहे. हे नवीन दर १ मे पासून लागू होणार होते, परंतु नागरिकांच्या विरोधानंतर उद्यान प्रशासनाने हा निर्णय पुढे ढकलला. या संदर्भात जारी केलेल्या एका ज्ञापनात म्हटले आहे की, प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे शुल्कवाढ पुढे ढकलण्यात आली आहे.