मुंबई

ऑरेंज गेट - मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्या : मुख्यमंत्री

CD

ऑरेंज गेट - मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्या : मुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हदरम्यानचा बोगद्याची प्रारंभिक कामे सुरू असली तरी मुख्य काम करण्यासाठी कालबद्ध नियोजन करून कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले. या प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक पार पडली. डी’मेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व मुक्तमार्ग व अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाची प्रारंभिक कामे प्रगतिपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण व पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. एस. व्ही. पटेल रस्ता व मरीन ड्राइव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारीकरणाची कामे नियोजनानुसार कराव्यात, असेही फडणवीस यांनी बजावले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, पालिका आयुक्त भूषण गगराणी, प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी आदी उपस्थित होते. हा प्रकल्प २०२८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून तो पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT