मुंबई

२१ एप्रिल रोजी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा फैसला होणार

CD

अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी
शिक्षेवर २१ एप्रिलला फैसला

मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलासह अश्‍विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी (ता. ११) पनवेल सत्र न्यायालयात केली. आरोपीच्या वकिलाने जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली. अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला २१ एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्या. के. जी. पालदेवार यांनी जाहीर केले. त्यामुळे कुरुंदकरला फाशी होणार की जन्मठेप, याकडे लक्ष लागले आहे.

अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून पुरावे नष्ट करणारा या हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याला मदत करणारे कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना न्या. के. जी. पालदेवार यांनी मागील सुनावणीत दोषी ठरवले होते. त्यानंतर न्या. पालदेवार यांनी अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि त्यांचे वडील, भाऊ, पती तसेच दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर आरोपींना शिक्षा ठोठावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात अश्विनी यांची मुलगी, वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे व पती राजू गोरे उपस्थित होते. या वेळी बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी कुरुंदकर याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. तसेच सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनीदेखील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली. आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
...
‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
अश्‍विनी बिद्रे हत्येच्या तपासातील हलगर्जी भोवणार
पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस दलातील काही पोलिस अधिकाऱ्यांनी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासात अक्षम्य दुर्लक्ष केले. या प्रकरणाच्या तपासाला हानी पोहोचून कुरुंदकरवरील कारवाई कशी टळेल, याची दक्षता घेतली. त्यामुळेच कुरुंदकरने अनेक पुरावे नष्ट केले, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी शुक्रवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयात सादर करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करून अभय कुरुंदकर याला मदत होईल, असे कृत्य केले होते. अश्विनी बिद्रे बेपत्ता होण्यामागे कुरुंदकर याचा हात असल्याचा आरोप असतानाही त्याचे नाव राष्ट्रपतिपदकासाठी पाठवण्यात आले होते. या दोन्ही प्रकारांबाबत न्या. पालदेवार यांनी गत सुनावणीवेळी नाराजी व्यक्त केली होती. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. कुरुंदकर याच्या नावाची राष्ट्रपतिपदकासाठी शिफारस करणाऱ्या कमिटीवर कारवाई करण्याची मागणी ॲड. प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली. त्यामुळे न्यायालयाकडून तपासात हलगर्जी करणारे पोलिस अधिकारी आणि राष्ट्रपतिपदकासाठी शिफारस करणाऱ्या कमिटीवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

SCROLL FOR NEXT