मुंबई

रेल्वे स्थानके कात टकणार

CD

रेल्वेस्थानकांच्या सौंदर्यीकरणावर भर
दिवा, मुंब्रा, शहाड, टिटवाळ्यात अत्याधुनिक सुविधा; ९३.४ कोटी खर्च
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील टिटवाळा, शहाड, दिवा, मुंब्रा ही रेल्वेस्थानके आता कात टाकणार आहेत. ही स्थानके अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असतील तसेच स्थानकांच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. स्थानकांवर प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, फूड कोर्ट्स, आधुनिक स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्केलेटर्स आणि डिजिटल सुविधा उपलब्ध होतील. यासाठी सर्व स्थानकांवर मिळून ९३.४ कोटी खर्च केले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी (ता. ११) त्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील काही रेल्वेस्थानकांचा समावेश केला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

रेल्वेच्या संसाधनांसह पायाभूत सोयी-सुविधांमध्ये केंद्र सरकारमार्फत सध्या एक लाख ७३ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यातून १,३०० रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील १३२ रेल्वेस्थानके आहेत. या सर्व स्थानकांचा विकास करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘अमृत भारत स्टेशन’ योजना लागू केली आहे. या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि मुंब्रा या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

स्थानकांची माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, की या रेल्वेस्थानकांचा आराखडा हा तिथले महत्त्व आणि इतिहास याला धरून केला आहे. या कामांची पूर्तता लवकरात लवकर केली जाईल. तसेच भविष्यात या योजनेत अजून नवीन रेल्वेस्थानकांची भर पडेल.

किती खर्च करणार?
टिटवाळा - २५ कोटी
दिवा - ४५ कोटी
मुंब्रा - १५ कोटी
शहाड - ८.४ कोटी

वाहनांसाठी स्वतंत्र थांबे
भविष्यात वन कार्ड हे तिकिटाचे कार्ड रेल्वेपासून, मेट्रो, बस यांना लागू पडणारे वन कार्ड याही स्थानकांना लागू होईल. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी संलग्न व अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाईल. तसेच, रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगसाठी मुबलक जागा आणि प्रवासी वाहतुकीच्या वाहनांसाठी स्वतंत्र थांबे केले जातील. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: भाजपचा दृष्टिकोन लज्जास्पद; ममता,भाजप बंगालींना त्रास देत असल्याचा आरोप

Viral Video: माणूस अन् माकडाची अनोखी मैत्री ! जिंकली लाखो लोकांची मने, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Solapur Crime : 'पांगरी येथे सव्वालाखांची दारू केली नष्ट'; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, दारूमुक्तीसाठी पुढाकार

Dinesh Karthik: लॉर्ड्सवर जितेश शर्माला खरंच सिक्युरिटी गार्डने अडवलं? कार्तिकने सांगितलं Viral Video मागील खरी कहाणी

Odisha News: ओडिशात जोरदार निदर्शने; न्याय मिळेपर्यंत लढा! सौम्याश्रीच्या मृत्यूने ओडिशा ढवळले, बीजेडीचा सचिवालयावर मोर्चा रोखला

SCROLL FOR NEXT