मुंबई

शेड नसल्याने प्रवाशांना बसताहेत उन्हाचे चटके

CD

बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : बदलापूर स्थानकाचा कायापालट करण्यासाठी काम सुरू आहे. या दरम्यान स्थानकात डेक बसवणार असल्याने फलाटांवरील पत्र्याचे शेड काढण्यात आले आहेत. सध्या छप्पर नसल्याने प्रवाशांना ४४ डिग्री सेल्सिअंशपर्यंत वाढलेल्या तापमान उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेत खासदार सुरेश म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वेस्थानक प्रबंधकांना पत्र पाठवत निदान पत्र्याची शेड टाकून प्रवाशांना थोडातरी दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. वरिष्ठ स्तरावर याबाबत माहिती कळविण्याचे आश्वासन रेल्वेस्थानक प्रबंधक धनश्री गोडे यांनी दिले आहे.
बदलापूर रेल्वेस्थानकातून रोज दीड लाख प्रवासी प्रवास करतात. बदलापूर स्थानकाचा कायापालट करण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून बदलापूर रेल्वेस्थानकात १२ मीटर लांबीचा बंदिस्त डेक बसवण्यात येणार आहे. या कामी स्थानकातील संपूर्ण छप्पर काढण्यात आले आहे. आतापर्यंत या डेकचे जवळपास ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सुरू आहे. मात्र, संपूर्ण छप्पर काढल्याने डेकचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत बदलापूरकरांना ऊन, वारा, पाऊस सहन करत स्थानकातून लोकल पकडावी लागत आहे.
बदलापूरकरांची हीच समस्या ओळखत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संसदीय अधिवेशनात बुलेट ट्रेन देण्यापेक्षा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामान्य सुविधा तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर बदलापूर स्थानकातील सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे रेल्वे प्रवाशांचे होत असलेले हालही निदर्शनास आणून दिले. या अनुषंगाने खासदार म्हात्रे यांनी डेकचे काम पूर्ण होईपर्यंत बदलापूर स्थानकातील रेल्वे प्रवाशांसाठी ऊन, वारा, पाऊस यातून संरक्षण होण्यासाठी तात्पुरत्या पत्र्याची शेड बसवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख व महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानक प्रबंधक गोडे यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT