मुंबई

सिडकोतर्फे आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह

CD

खारघर, ता. १३ (बातमीदार) : सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिडकोच्या अग्निशमन विभागाची स्थापना २७ नोव्हेंबर १९७३ला करण्यात आली. सिडकोच्या अग्निशमन सेवेला ५०हून अधिक वर्षे झाली असून, अग्निशमन जवान २४ तास सेवा करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येत आहे. सोमवारी (ता. १४) खारघर येथील अग्निशमन केंद्रात हुतात्मा झालेल्या अग्निशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. १५ ते १९ एप्रिलदरम्यान निवासी, वाणिज्यिक, शैक्षणिक इमारती व गोदामे (वेअरहाऊस) येथे मॉक ड्रिल, तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये अग्निसुरक्षेकरिता घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन शिबिरे व प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता २० एप्रिलला मुंबई येथे होणार आहे. अग्निशमन सेवा सप्ताहाअंतर्गत मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे यांच्याकडून सिडकोच्या नवी मुंबईतील अधिकार क्षेत्रामध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
--------------
धोक्यांबाबत जागृती
नागरिकांमध्ये आगीच्या धोक्यांबाबत जागृती निर्माण करणे व इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेऊन आग लागल्यास तत्काळ उपाययोजना करणे, हा या जनजागृतीपर कार्यक्रमांचा उद्देश आहे. इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे व आपत्कालीन परिस्थितीत तिचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या नजीकच्या अग्निशमन केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन सिडको अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT