खारघर, ता. १३ (बातमीदार) : खारघर सेक्टर १२ येथील अग्निशमन केंद्रामागील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशा मागणीचे पत्र खारघर कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधू पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
खारघर सेक्टर १२ येथील अग्निशमन केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या ई विभागात १५ मीटरचा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी पाच मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र उर्वरित १० मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्यामुळे रस्त्याचे दोन भाग पडले आहेत. हा रस्ता अग्निशमन केंद्राला लागून आहे. या रस्त्यावरून अग्निबंब वाहने नियमितपणे ये-जा करीत असतात. शिवाय रस्त्याच्या कडेला गुडविल इमारतीत अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत; तर बाजूला लहान मुलांची शाळा, काही अंतरावर मॉल आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. पुढील दोन महिन्यांनंतर पावसाळा सुरू होणार आहे. पनवेल पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करावे, असे पत्र खारघर कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधू पाटील यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे. खारघर परिसरात बहुतांश भागांत रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्त्यांची पाहणी केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.