महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या भरतीची शक्यता
७००हून अधिक पदे भरणार असल्याची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १३ : केईएम, सायन, नायर आणि कूपर या महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील डॉक्टरांचा तुटवडा लवकरच भरून निघणार आहे. महापालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ७०० हून अधिक डॉक्टरांची भरती करणार असल्याचे सांगितले जात आहे. ही भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आदी पदांसाठी केली जाणार असून, ती पूर्णवेळ स्वरूपात असेल.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण ८९१ सहाय्यक प्राध्यापक पदे असून, त्यापैकी ४३९ पदे रिक्त आहेत. सध्या अनेक प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर काम करत असून, काही जण सात ते आठ वर्षांपासून करारावर कार्यरत आहेत. त्यामुळे कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णसेवेसोबतच विद्यार्थ्यांचे अध्यापन आणि प्रशासकीय कामांवरही परिणाम होत आहे.
आरक्षण बदलामुळे भरती प्रक्रिया रखडली होती, मात्र महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर सर्व फायली नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्या असून, लवकरच अंतिम परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. या भरतीमुळे वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा दोन्ही अधिक प्रभावी होणार आहे.
- डॉ. नीलम आंद्राडे,
संचालिका, वैद्यकीय महाविद्यालये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.