आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
मुंबई, ता. १३ : राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत ३४, ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन रखडले असून, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जानेवारीचे वेतन उशिरा मिळाले असले तरी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे वेतन अद्यापही या कर्मचाऱ्यांना मिळालेले नसल्याची बाबसमोर आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालये, उपकेंद्रे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे कर्मचारी सेवेत आहेत. त्यांचे वेतन दरमहा १५,५०० ते ६०,००० रुपये दरम्यान आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारसाठी केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के निधी देत असले तरी, सध्या राज्य सरकारकडून निधी मिळालेला नाही. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेतन न देण्याचे स्पष्ट कारण अद्याप जाहीर केलेले नाही. याविरोधात काही कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत शांत आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र आरोग्यसेवा अपर संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले की, ‘संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले नाही. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या काही जिल्ह्यांमध्येच तांत्रिक अडचणींमुळे वेतन वेळेवर मिळालेले नाही.’
---
काम बंद आंदोलनाचा इशारा
कर्मचाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, तत्काळ वेतन न दिल्यास कामबंद आंदोलन हाती घेतले जाईल. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.