किन्हवली, ता. १३ (बातमीदार)ः शहापूर तालुक्यातील महर्षी वाल्मीक ऋषींचे समाधीस्थळ असलेल्या आजोबा पर्वत देवस्थानाच्या रोषणाईचे काम दीड वर्षांपासून रखडले होते. अशातच शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार सुरेश म्हात्रे यांनी वीजवितरण कंपनीच्या उपअभियंत्यांना संपर्क करताच तत्काळ रोषणाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शहापूर तालुक्यात डोळखांब परिसरातील सह्याद्री पर्वतरांगेत रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषींचे समाधीस्थळ असलेले आजोबा देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी डी.पी.डी.सी.अंतर्गत मंजूर झालेले विद्युत रोषणाईचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे; मात्र भूमिगत केबल टाकण्याचे काम मंजूर असताना फक्त ठेकेदार, अधिकारी तसेच वनविभागातील समन्वयाच्या अभावामुळे तांत्रिक पूर्तता असल्याने बंद होते. ही बाब शहापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी डोळखांब येथे आलेल्या खासदार सुरेश म्हात्रे यांना माहीत पडली होती. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत खासदारांनी रखडलेले रोषणाईचे काम सुरू करण्याबाबत महावितरणचे उपअभियंता यादव इंगळे यांना भ्रमणध्वनीद्वारे सूचना केली. त्यामुळे या कामाला सुरुवात झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
----------------------------------------------------
वनविभागाच्या विविध योजना राबविणे, भक्तनिवास, वाहनासाठीची जागा, पशू, पक्षी निरीक्षण केंद्र, औषधी वनस्पती संशोधकांसाठी अभ्यास केंद्र अशा सुविधा होणे गरजेचे आहे. तसेच सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सुरेश म्हात्रे, खासदार, भिवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.