मुंबई

शिक्षणाला महत्त्व देणारेच बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी

CD

नेरूळ, ता. १३ (बातमीदार) : डॉ. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे शिक्षणाचा ध्यास आणि ज्ञानाची आस आहे. बाबासाहेबांचा अनुयायी म्हणवून घ्यायचे असेल तर शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. शिक्षण आणि प्रबोधन हाच उन्नतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. मृदुल निळे यांनी केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पंधरवडाभर आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर’ व्याख्यानमालेमध्ये मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक, संशोधक मृदुल निळे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समाजातील उपेक्षितता, मुक्ती आणि जाणीव’ या विषयावर विवेचन केले. १९३८ मध्ये प्रसिद्ध ‘अनटचेबल वर्कर्स ऑफ बॉम्बे सिटी’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावना लिहिलेल्या जी. आर. प्रधान यांच्या पुस्तकातील माहितीचे विश्लेषण करीत त्या वेळी सर्वेक्षण करून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये आजच्या काळातही फारसा सामाजिक व आर्थिक बदल झाल्याचे दिसत नाही, याबाबतची तुलनात्मक आकडेवारी प्रा. निळे यांनी सांगितली.
-----------
सामाजिक व आर्थिक समानता गरजेची
प्रा. मृदुल निळे यांनी १९३८ आणि २०२४मधील शिक्षण, रोजगार, उत्पन्न, आर्थिक साधने व उसनवारी अशा विविध अंगांनी आकडेवारी व माहितीचे विश्लेषण करीत सामाजिक स्थितीत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही हे स्पष्ट केले. बौद्ध धर्म स्वीकारतानाही बाबासाहेबांनी समाजाला स्वत:ची ओळख देणे गरजेचे असल्याचे जाणले व तर्कशुद्धता, सुधारणा व विवेक या त्रिसूत्रीच्या आधारावर उभ्या असलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे सांगितले. बाबासाहेबांच्या समानतेवर आधारित देशनिर्मितीचा भाषणाचा दाखला देत प्रा. मृदुल निळे यांनी सामाजिक व आर्थिक समानता हाच विकासाचा आधार असल्याचे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT