मुंबई

भिवंडी आगारात समस्यांचा थांबा

CD

भिवंडी, ता. १३ (बातमीदार): भिवंडी आगारात परिवहनच्या गाड्यांसह खासगी गाड्यादेखील भंगार स्वरूपात उभ्या आहेत, पण आगारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भंगार गाड्यांची विल्हेवाट लावताना आगारातील सुरक्षा यंत्रणा वाढवावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भिवंडी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वारगेट आगारात महिला अत्याचाराची घटना घडली आहे. त्याचे स्वरूप पाहता भिवंडी आगारात काही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भिवंडी आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. या वेळी आगारात २४ तास पोलिस बंदोबस्त असावा. बसस्थानकाच्या नूतनीकरणाबाबत कामांना चालना द्यावी. संपूर्ण बसस्थानक पेव्हर ब्लॉक लाऊन किंवा काँक्रीटीकरण करून सुशोभित करावे, बसस्थानकावर रंगरंगोटी करून गावांचे आणि थांब्याच्या नावाचे फलक ठळक अक्षरात करावे, बसस्थानकातील उपहारगृहात स्वच्छ, सुंदर करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी भिवंडी जिल्हा प्रमुख मनोज गगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भिवंडी बसस्थानकाचे आगारप्रमुख इरफान पटेल यांना निवेदन दिले. या वेळी महिला जिल्हा संघटक वैशाली मेस्त्री, जिल्हा सचिव राजेंद्र पुण्यार्थी, सचिव नितेश दांडेकर, समन्वयक रमेश नाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Kerala Minister Controversy : बेडरुममध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत मंत्री, पत्नीने रंगेहात पकडताच म्हणाला- माझे ५ हजार अफेअर्स, कुणी...

Pune : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर येताना दिसली, मागच्याने उडी मारली; दुचाकी चालकाला उडवलं, एकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : इराण–इस्रायल तणावाचा परिणाम? कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

SCROLL FOR NEXT