शहापूर, ता. १३ (वार्ताहर): महेंद्र महाडिक लिखित व दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग शहापूर तालुक्यात होणार आहे. मे महिन्यात त्याचे सादरीकरण केले जाईल, अशी घोषणा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी (ता. १२) केली. खर्डी, वासिंद येथील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची माहिती त्यांनी दिली.
शिवपुत्र संभाजी नाटकात अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून, राजन बने बादशहा औरंगजेबाची भूमिका निभावत आहेत. सोबतच महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंताच्या भूमिकेत महेश कोकाटे, दिलेरखान आणि मुकर्रबखान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडके, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे आणि सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत रमेश रोकडे अशा सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात आहे. या महानाट्यात चित्तथरारक घोडेस्वारी, तडाखेबाज संवाद, १२० फुटी रंगमंच, ५५ फुटी तीनमजली किल्ल्याची प्रतिकृती, मराठे-मोगल रणसंग्राम, २२ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी गनिमी काव्याची बुऱ्हाणपूर मोहीम, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर अशी वैशिष्ट्ये आहेत. आतापर्यंत पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कऱ्हाड, पिंपरी चिंचवड, भोसरी, हडपसर, नागपूर, रोहा, डोंबिवली, धुळे अशा ठिकाणी महानाट्याचे जवळपास २८५ प्रयोग झाले आहेत.
--------------------------------------------------------
महाराष्ट्राच्या विधानसभेविषयी संभ्रम
महाराष्ट्राच्या विधानसभेविषयी अद्याप अनेकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. निवडणूक आयोगाची जी मूलभूत तत्त्वे आहेत ती सातत्याने बदलली जातात. त्यामुळे हा संभ्रम आणखीन गडद झाला आहे. परंतु, निकोप लोकशाहीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सरकारने करायला हवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी शहापूर तालुक्यातील खर्डी येथे व्यक्त केले. दिलीप विनायक अधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नामकरण व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी कोल्हे यांनी उपस्थित लावली होती. या वेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे, समाजकल्याण न्यासचे सोन्या पाटील, संस्थेचे चेअरमन दिलीप अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.