मुंबई

खातीवलीची चौफुली लवकरच अपघातमुक्त

CD

किन्हवली, ता. १३ (बातमीदार)ः मुंबई-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून खातीवली-वासिंद येथे उड्डाणपूल बांधण्याची मागणी होती. यासाठी स्थानिकांनी तब्बल आठ वर्षे पाठपुरावा केला होता. अखेर महामार्ग प्रशासनाने उड्डाणपुलाचे काम सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.
खातीवली येथील शुभवास्तू गृहसंकुलाकडे जाणाऱ्या चौफुलीजवळ उड्डाणपूल नसल्याने शेकडो अपघात झाले आहेत, तसेच अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. विशेष म्हणजे बहुतांशी अपघात हे दुचाकीस्वारांचे झालेले आहेत. त्यामुळे खातीवली ग्रामपंचायत हद्दीत उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीसाठी नाशिक येथील महामार्ग प्रशासनातील अधिकाऱ्यांची तीन वर्षांपूर्वी भेट घेतली होती. मात्र महामार्ग प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदार खातीवली उड्डाणपुलाबाबत निरुत्साही असल्याने खातीवली माजी उपसरपंच साईप्रसाद काबाडी, ग्रामस्थ प्रशांत महाजन, एकनाथ तारमळे यांनी महामार्ग प्रशासनाकडे आंदोलने, उपोषण, पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. अखेर या आंदोलनांची दखल घेत महामार्ग प्रशासनाने खातीवली-वासिंद येथील चौफुलीवर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT