मुंबई

घाटकोपर पश्चिम डोंगराळ भागातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल

CD

डोंगराळ भागातील नारिकांचे पाण्यासाठी हाल
घाटकोपर पश्‍चिमेत कमी दाबाने पाणी
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना कमी दाबाने पाणी येत असून, दिवसेंदिवस ही समस्या बिकट होत आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून येथील लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने मुंबई युवक अध्यक्ष व प्रवक्‍ते ॲड. अमोल मातले यांनी शिष्टमंडळासह उपजल अभियंता पूर्व उपनगरे शांताराम राणे व इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
घाटकोपर पश्चिम, पारशीवाडी, गोसावी चाळ, आझाद नगर, काजू टेकडी, सिद्धार्थ नगर, रामजी नगर, खंडोबा टेकडी, रामनगर तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षा नगर, नागोबा नगर, पवईमध्ये गौतम नगर, चांदिवलीमध्ये नारायण नगर, अशोक नगर, ९० फूट रोड येथील डोंगराळ भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
रात्री उशिरा केवळ अर्धा तासांकरिता कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी पोहोचत नाही. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती अशा सर्व घटकांना त्‍यामुळे मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. वारंवार लेखी तक्रार देऊनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या वेळी मातेले यांनी दिला.
या वेळी युवक काँग्रेस ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, मुंबई सरचिटणीस इमरान तडवी, सचिव हनीफ पटेल, घाटकोपर तालुका अध्यक्ष प्रशांत कालेकर, कार्याध्यक्ष अक्षय खिल्लारी, चांदिवली तालुकाध्यक्ष कुतुब अलम शाहा, तालुकाध्यक्ष अनवर दळव, सरचिटणीस राहुल टिकेकर, वाॅर्ड अध्यक्ष मुबारक शेख व खलील मामू शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT