पनवेल, ता. १३ (बातमीदार) : एकीकडे कॅरिबॅग नागरिकांसाठी अपायकारक ठरत असल्याने राज्य सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी कॅरिबॅगचा वापर करू नये, असे आवाहन करूनदेखील पनवेल शहरासह वसाहतींमधून प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. दुकानात प्लॅस्टिकचा वापर केल्यास २५ हजारांपर्यंत दंड व गुन्हा दाखल झाल्यास तीन महिन्यांपर्यंत कैदेची तरतूद असतानाही पनवेल शहरासह वसाहतींमधून प्लॅस्टिक पिशव्यांचा बेसुमार वापर होत आहे.
पनवेल शहरातील बाजारपेठ, भाजी बाजार व फळ बाजारातदेखील सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. लहान-मोठे व्यापारी दुकानांवर प्लॅस्टिक पिशव्या ठेवत आहेत. त्यामुळे ग्राहकदेखील घरातून निघताना कापडी पिशव्या घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ग्राहक साहित्य घरी नेल्यानंतर ती पिशवी कचऱ्यामध्ये टाकतात. त्यामुळे मोकाट जनावरे कचरा खात असताना त्यांच्या पोटामध्ये पिशव्या जात आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. दुकानात प्लॅस्टिकचा वापर केल्यास २५ हजारांपर्यंत दंड व गुन्हा दाखल झाल्यास तीन महिन्यांपर्यंत कैदेची तरतूद असतानाही पनवेल शहरासह वसाहतींमधून प्लॅस्टिक पिशव्यांचा बेसुमार वापर होत आहे. पनवेल महापालिकेने मागील वर्षी ११२ कारवायांमधून तीन हजार ५७ किलो प्लॅस्टिक जप्त केले व पाच लाख ६० हजार रुपये दंड वसूल केला आहे. यावर्षी तीन महिन्यांत अवघ्या सात कारवाया झाल्या असून, ३३० किलो प्लॅस्टिक व ३५ हजार दंड वसूल केला आहे. महापालिकेकडून प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असला, तरी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचे दिसून येते.
---------------
पावसाळ्यात तुंबतात नाले
प्रतिबंधित प्लॅस्टिकच्या वस्तू आणि साहित्याचा वापर, वाहतूक किंवा साठवणूक केल्याचे आढळल्यास दंड आणि तीन महिने शिक्षेची तरतूद केली आहे. प्लॅस्टिकचा सर्रास वापर करून त्या फेकून दिल्या जातात. हे फेकलेले प्लॅस्टिक नाल्यात अडकून पुलांच्या नळकांड्या जॅम होतात. त्यामुळे पावसाळ्यात थोडा पाऊस झाला की, शहर तुंबल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे प्लॅस्टिक जनावरांसाठी धोकादायक आहे.
-----------
पिशवी असेल तर होते खरेदी
कॅरिबॅगवर बंदी आहे; मात्र ग्राहक अगोदर कॅरिबॅगची चौकशी करतात, नंतरच सामान खरेदी करतात. यामुळे पिशव्या ठेवाव्या लागतात. काही जण घरातून पिशवी घेऊन येतात. काही ग्राहक कॅरिबॅग असेल, तरच सामान घेतात, नाहीतर परत जातात. ग्राहक परत जाऊ नये यासाठी नाइलाजाने कॅरिबॅग ठेवावी लागते, असे फळविक्रेत्याने सांगितले.
---------------------
पनवेल पालिका क्षेत्रामध्ये प्लॅस्टिकबंदीच्या अनुषंगाने वारंवार कारवाई केली जाते. माल जप्त करून पालिकेने लाखोंचा दंडही वसूल केला आहे. बाजारात भाजीपाला किंवा किराणा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सोबत कापडी पिशवी घेऊन जावी. त्यामुळे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा प्रश्न येतच नाही.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.