मुंबई

सासन काटीसह निघाली ज्‍योतिबाची पालखी

CD

सासन काटीसह निघाली जोतिबाची पालखी
धारावीत यात्रेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
धारावी, ता. १३ (बातमीदार) : धारावीत १५० वर्षांपासून सुरू असलेली जोतिबा पालखी आणि सासन काठी सोहळा शनिवारी (ता. १२) मोठ्या भक्‍तिभावात पार पडला. महाराष्ट्राचे दैवत श्री जोतिबा यांचे प्रति कोल्हापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीतील मंदिरात दरवर्षी यात्रा भरते.
काही वर्षांपासून यात्रेत सासन काठी काढण्यास बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, धारावीतील हिंदू संघटना व राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन प्रशासनासोबत चर्चा करून यात्रेत सासन काठी नाचवण्यास काही अटींवर परवानगी दिली. गुलाल, खोबरे उधळत ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ असा जयघोष भाविक करीत होते. धारावीत दरवर्षी दख्खनचा राजा जोतिबाची चैत्री यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत होते. पालवाडी येथे जोतिबाचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी मंदिराजवळ यात्रा भरते. यात्रेत मुंबईसह आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. दिवसभर यात्रा पार पडल्‍यावर सायंकाळी जोतिबाच्या पालखीची मिरवणूक संपूर्ण धारावीत फिरते. या वेळी शेकडो भाविक उपस्‍थित असतात. भाविकांनी मंदिराजवळ सासन काठीची पूजा केली.
पालखी मिरवणूक संध्याकाळी पालवाडी येथील जोतिबा मंदिरातून निघाली. कुट्टवाडी, धारावी मुख्य रस्ता, धारावी कोळीवाडा, काळा किल्ला, संत कक्कया मार्गाने पालखीची मिरवणूक फिरली. पालखीच्या मार्गावर भाविकांनी दर्शन घेण्यास गर्दी केली होती. अबीर व खोबरे उधळले जात होते. उधळलेले खोबरे प्रसाद म्हणून घेण्यास मोठी झुंबड उडत होती. जागोजागी भाविकांसाठी स्थानिक मंडळे, संघटनांनी थंड पाणी, सरबत वाटपाची सोय केली होती. सकिनाबाई चाळ येथील हराळे सेवा संघातर्फे थंड पेय व लाडू वाटप करण्यात आले. दरवर्षी मंदिराचे विश्वस्त शिंदे कुटुंबीय व स्थानिक हिंद भूमी क्रीडा मंडळ मिळून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पालखीत पारंपरिक वाद्यावर तरुणांनी ठेका धरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT