मुंबई

अजंठा प्रवासी बोटसेवेवर निर्बंध

CD

अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः अलिबाग समुद्रकिनारी अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटसेवेच्या हलगर्जीमुळे वारंवार दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे अजंठा बोटसेवेचा परवाना रद्द करून वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी असणाऱ्या पीएनपी व मालदार या बोट सध्या हाउसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईहून अवघ्या एका तासात अलिबागला जाण्यासाठी काही वर्षांपासून सागरी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अजंठा कॅटमरॉन सर्व्हिसेस, पीएनपी व मालदार अशा कंपन्यांकडून सागरी वाहतूक करण्यात येते, मात्र अनेकदा अतिरिक्त प्रवासी, प्रशिक्षण नसलेले कर्मचारी यामुळे बोट बंद पडणे, भर समुद्रात दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवासी जलवाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
अजंठा कॅटमरॉन सर्व्हिसेसच्या बोटीला शुक्रवारी झालेल्या घटनेप्रकरणी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सागरी मंडळाने त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन केली असून, लवकरात लवकर अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. दुर्घटनेतील बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला असून, नोंदणी प्रमाणपत्र तसेच सर्व्हे प्रमाणपत्रदेखील मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार, तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या बोटीस पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

नियमावली तयार करण्याचे निर्देश
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घटनेबाबत बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या जीवावर बेतणारी अशा प्रकारच्या हलगर्जी अजिबात खपवून घेणार नाही. दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बोटींची नोंदणी तसेच तांत्रिक बाबींबाबत सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी विभागाला दिले आहेत.

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT