नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नवी मुंबई पोलिस दलात, तसेच इतर पोलिस घटकांमध्ये, राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या, तसेच सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (ता. १५) सकाळी ९ ते ४ या वेळेत नेरूळ सेक्टर-२४ मधील आगरी कोळी भवनमध्ये आयोजित या पोलिस कल्याण रोजगार मेळाव्यात सुमारे दोन हजार पोलिस पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या पोलिस कल्याण रोजगार मेळाव्यात मुंबई, ठाणे व नवी मुंबई हद्दीतील विविध क्षेत्रातील १००हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून, त्यांच्याकडून दोन हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्याकरिता विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या दीड हजार पोलिस पाल्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये अनुभवी व नवोदित उमेदवारांचा सहभाग असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील यांनी दिली. या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या पोलिस पाल्यांना त्याच दिवशी नियुक्ती पत्रे दिली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.