सरकारप्रमाणेच तिकीट दरात सवलत द्या
आमदार स्नेहा दुबे पंडित यांची मागणी
विरार, ता. १३ (बातमीदार) : एसटी महामंडाळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर केलेली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे व नवी मुंबई महापालिका प्राधिकरणाने त्यांच्या शहरातील महिलांनाही सरकारच्या धोरणानुसार ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील महिलांनाही पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना अद्याप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ही सुविधा पालिकेच्या बससेवेत सुरू करण्याची मागणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या योजनेसाठी सरकारकडून अतिरिक्त अनुदान देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडील, महिला व बालकल्याण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के आरक्षित निधीमधून पालिकेने या प्रयोजनासाठी खर्च करून ही सवलत तत्काळ सुरू करावी, अशी मागणीही आमदार पंडित यांनी केली आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.