मुंबई

रायगडात २,३११ कोटींची गुंतवणूक

CD

अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः रायगडमध्ये उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांसोबत दरमहा जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केले. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५ कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात एकूण दोन हजार ३११ कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले असून यातून दोन हजार ८६५ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृद्धी तसेच औद्योगिक विकासाकरिता महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून जिल्हा गुंतवणूक परिषद २०२५चे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे शुक्रवारी (ता. ११) करण्यात आले होते. परिषदेकरिता कोकण विभाग उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक मोरे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, स्टेट बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक विलास शिंदे तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षासह सुमारे २५० पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते.
उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी, जिल्हा गुंतवणूक परिषदेचे उद्देश व एकंदरीत कोकण विभागातील औद्योगिक विकास व विस्तार याबाबत माहिती देत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने १०० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उद्दिष्ट यंदा साध्य केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. उद्योग विभागाने मैत्री २.० सारखे अत्याधुनिक पोर्टल सुरू केल्याने नवीन गुंतवणूकदारांना एक खिडकी सुविधा प्राप्त झाल्‍याचे सांगितले. जिल्हा गुंतवणूक परिषदेस एमआयडीसी, नगररचना विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, मैत्री, इंडियन पोस्ट या विभागाचे सादरीकरण करण्यात आले.

उद्योजकांना कराराचे वाटप
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेकरिता रायगड जिल्ह्यातील एकूण २२५ पेक्षा अधिक उद्योजकासह जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांचा सहभाग होता. सामंजस्य करारातील काही उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले. तसेच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत १०० टक्‍के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या बँकाचे प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.

सामंजस्य करारानुसार रायगड जिल्ह्यात गुंतवणूक करण्यात आलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. त्‍यामुळे भविष्‍यात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने प्रथमच १०० टक्‍के उद्दिष्ट पूर्ण केल्याने जिल्हा उद्योग केंद्र व सर्व बँकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जिल्ह्यात अस्तित्वातील सर्व उद्योजकांचे १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अनुषंगाने समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT