रेल्वे गाड्यांच्या वेगमर्यादेत वाढ
मध्य रेल्वेच्या मार्गांवर प्रवास वेळेत लक्षणीय बचत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवर रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यात आल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद व सुसाट झाला आहे. रेल्वे रुळांचे सक्षमीकरण, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक सुधारणा या कारणांमुळे हे शक्य झाले असून, काही मार्गांवर तब्बल ३० किमी प्रतितास इतकी गतिवाढ नोंदवण्यात आली आहे.
पनवेल ते कर्जत मार्गावरील गाड्यांचा वेग आता ११० किमी प्रतितास झाला आहे. यापूर्वी या मार्गावर गाड्या १०५ किमी प्रतितास वेगाने धावत होत्या. त्याचप्रमाणे पनवेल ते जेएनपीटी मार्गावर वेग ६५ किमीवरून ९५ किमी प्रतितास इतका वाढविण्यात आला आहे. टिळकनगर ते पनवेल मार्गावर ८० वरून ९५, बडनेरा ते अमरावती या मार्गावर ९० वरून ११०, तर भुसावळ ते खंडवा मार्गावर गाड्या १३० किमी प्रतितास वेगाने धावत आहेत. यामुळे प्रवासाच्या कालावधीत लक्षणीय बचत होत असून, वेळेचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक झाले आहे. वेगवाढीसोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या असून, अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा, ट्रॅक निरीक्षण प्रणाली आणि देखभाल यंत्रणांमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळेच्या अचूकतेत भर पडली आहे.
पायाभूत सुविधेच्या कामाला गती
मध्य रेल्वेवरील गाड्यांच्या वेगवाढीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने विविध स्थानकांवर पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामालाही गती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, अजनी, नाशिक रोड, खंडवा आणि होटगी स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येत आहेत. काही ठिकाणी नव्या पादचारी पुलांचे बांधकाम, प्लॅटफॉर्म अपग्रेडेशन, प्रतीक्षालय आणि बुकिंग कार्यालयांची उभारणी सुरू आहे.
रेल्वे विभाग मार्गाची लांबी (किमीमध्ये) नवी वेगमर्यादा (किमी प्रतितास)
पनवेल - जेएनपीटी २८.०६ ६५ ते ९५
टिळकनगर - पनवेल ३२.५३ ८० ते ९५
पनवेल - कर्जत २६.१८ १०५ ते ११०
बडनेरा - अमरावती ९.०० ९० ते ११०
भुसावळ - खंडवा १२२.८ ११० ते १३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.