मुंबई

लोकल गर्दीचे २७२ बळी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः नोकरी-व्यवसायासाठी लोकलच्या वेळापत्रकावर धावणाऱ्या मुंबई, ठाणेकरांचा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा झाला आहे. लोकल फेऱ्यांच्या तुलनेत वाढलेल्या गर्दीने १५ महिन्यांत २७२ जणांचा बळी घेतला असून, पुरुष प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
मुंबईच्या १० बाय १०च्या चाळीच्या घरात राहणारे चाकरमानी आता ठाणे, डोंबिवली, कल्याण ते थेट बदलापूर, कसाऱ्यापर्यंत स्थलांतरित झाला आहेत. पण नोकरी, धंदा, शिक्षणासाठी मुंबईशी त्यांची नाळ कायम आहे. त्यामुळे रोज सकाळी एक ते दीड तासाचा लोकल प्रवास करून मुंबई गाठायची आणि सायंकाळी तितकाच प्रवास करून घरी पोहोचायचे, असा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत लोकल सेवा तोकडी असल्याने त्याची मोठी किंमत प्रवाशांना चुकवावी लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी जीवघेणी ठरत असून, दररोज होणाऱ्या रेल्वे अपघातामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व तर काहींना स्वतःचा जीवही गमवावा लागला आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतील ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली तर डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, भिवंडी, खारबाव, कामन रोड आणि जूचंद्र रेल्वे स्थानकांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर कल्याण रेल्वे पोलिसांच्या अंतर्गत कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा मार्गावर सर्वाधिक अपघातांची नोंद आहे.
-------------------------------------
नुकत्याच झालेल्या दुर्घटना
उल्हासनगर येथील २५ वर्षीय रोहित मगर अंबरनाथला लोकलने प्रवास करीत असताना कानसई ते उल्हासनगरदरम्यान धावत्या लोकलमधून पडला. चार दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याआधी सात दिवसांपूर्वी नोकरीसाठी डोंबिवलीहून मुंबईला निघालेल्या रूपेश गुजर याचा गर्दीमुळे कोपर-दिवादरम्यान धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. अशा एक-दोन नव्हे तर दीड वर्षामध्ये दोन शतकांहून अधिक घटना घडल्या असून, हे सत्र अजूनही सुरूच असल्याने लोकल प्रवास धोकादायक बनला आहे.
-----------------------------------------
लोकाच्या दरवाजात लटकण्याची वेळ
ठाणे ते कसारा मार्गावर लोकलची गर्दी दिवसागणिक वाढत चालली आहे. त्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या मर्यादित राहिल्या आहेत. या मार्गावर पाच ते १५ मिनिटांनी एक लोकल फेरी असल्यामुळे लोकलमध्ये चढण्यासाठी चढाओढ असते. कार्यालये सुटल्यानंतर ही गर्दी आटोक्याबाहेर जाते. त्यामुळे लोकाच्या दरवाजात हाताच्या चार बोटांचा आधार घेत प्रवासाची कसरत करावी लागते. यात केवळ पुरुषच नाही तर महिला प्रवासीही आघाडीवर आहेत.
----------------------------------
रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यूला आमंत्रण
गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असताना त्याहून अधिक रेल्वे रूळ ओलांडतानाही प्रवासी मृत्यूच्या दाढेत जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ महिन्यांत रेल्वे रूळ ओलांडताना ३९१ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.
---------------------------------------------------------
६६३ प्रवाशांचा अपघाती मृत्यू
ठाणे ते कसारा मार्गावर जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीमध्ये लोकल प्रवासात ६६३ प्रवासी मृत्युमुखी पडले असल्याची नोंद आहे.
---------------------------------
२०२४ वर्षभरातील मृत्यू
पोलिस ठाणे लोकलमधून पडून रूळ ओलांडताना
ठाणे १५१ ६८
डोंबिवली ५४ ३९
कल्याण १०४ ११६

२०२५ जानेवारी ते मार्च
पोलिस ठाणे लोकलमधून पडून रूळ ओलांडताना
कल्याण - ४४ १४
डोंबिवली १४ ७
कल्याण २४ २८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT