मुंबई

सिडको घरांच्या अवास्तव किंमतीविरोधात चित्र प्रदर्शन

CD

सिडको घरांच्या अवास्तव किमतीविरोधात चित्र प्रदर्शन
वाशी, ता. १३ (वार्ताहर) : सिडकोच्या सोडतीतील घरांच्या अवास्तव किमतीविरोधात मनसे व सिडको सोडतधारकांच्या वतीने रविवारी (ता. १३) वाशी येथे भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सिडकोने परवडणाऱ्या घरांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचा आरोप सोडतधारकांनी या वेळी केला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुखवट्यांद्वारे प्रतीकात्मक पद्धतीने करण्यात आले. या माध्यमातून सरकारच्या व सिडकोच्या भूमिकेवर सोडतधारकांनी तिखट टीका केली. चित्रांद्वारे सिडकोच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. खारघर, वाशी, तळोजा, खारकोपर आदी नोडमधील सोडतधारकांनी सिडकोच्या दररोजच्या प्रकल्पांमधील विसंगती, दर्जा आणि किंमतीतील तफावत विविध चित्रांद्वारे यावेळी मांडली. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोविरोधात सुरू असलेल्या लढ्यात हे प्रदर्शन एक टप्पा ठरला. कायदेतज्ज्ञ शहाजी पाटील यांनी सिडकोविरोधात रेरा कायद्यानुसार कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच येत्या बुधवारी सर्व सोडतधारकांसोबत रेरा कार्यालयात तक्रार दाखल करण्यात येईल, अशी घोषणा काळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT