मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारासंबंधी व्याख्यान

CD

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांसंबंधी व्याख्यान
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः नवी मुंबईत विविध धार्मिक संस्था-संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवार १४ एप्रिल रोजी साजरी होत आहे. खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने सकाळी ९ वाजता शांताबाई रामराव सभागृह सेक्टर-७, सत्याग्रह कॉलेज खारघर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक प्रेरणा आणि विचार या विषयावर चिंतन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आदर्श शिक्षण संचालक-संस्थाचालक यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रदर्शनदेखील भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिवसभर डॉ. आंबेडकर अनुयायींसाठी खुले असून, या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्या नेहा राणे आणि प्राचार्य वनिता सूर्यवंशी यांनी केले आहे, तर ऐरोली-रबाळे परिसरात मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि कांशीराम हिंदी विद्यालयात सकाळी करण्यात आले आहे. या ठिकाणी शालेय विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. पंचशील बुद्ध विहारात विविध धार्मिक कार्यक्रम, तर दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ऐरोली-रबाळे परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, यात आंबेडकर अनुयायींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेविका रंजना सोनावणे आणि माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनावणे यांनी केले आहे. तर सीबीडी आयकर कॉलनी येथे धम्मदीप दमाजिक संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दिवसभर विविध स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असून, सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप होणार आहे.
...........
पनवेल महापालिकेच्या वतीने आज भव्य मिरवणूक
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवारी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीसाठी पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
या मिरवणुकीची सुरुवात सकाळी साडेसात वाजता पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, पूजापाठ करून होणार आहे. त्यानंतर लगेच या ठिकाणाहून भव्य मिरवणूक निघणार आहे. त्‍यानंतर समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे होणार आहे. ही मिरवणुक पुढील मार्गाने जाणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक – एमटीएनएल कार्यालय– संत जगनाडे महाराज चौक – रोहिदास वाडा – टपाल नाका – कर्नाळा सर्कल – भाजी मार्केट – कर्मवीर भाऊराव पाटील चौक – विरूपाक्ष मंदिर– लाइन आळी – गुणे हॉस्पिटल –भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (समारोप).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, मुंबईत भाजीपाला स्वस्त

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SCROLL FOR NEXT