राडारोडाच्या भरावामुळे झाडांची कत्तल
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः बेलापूर विभागांतर्गत गणपतशेठ तांडेल मैदानालगत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. या राडारोड्यामुळे येथील झाडे मृत होत चालली आहेत; मात्र या प्रकाराकडे परिमंडळ एक व उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर संबंधित कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात नवीन इमारती तसेच पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे; मात्र खोदकाम करताना तेथून निघणाऱ्या राडारोड्याची रीतसर विल्हेवाट लावणे बंधनकारक असते; मात्र असे असताना हा राडारोडा कंत्राटदाराच्या माध्यमातून खुले मैदान, रस्त्याच्या बाजूला, कांदळवनात मोठ्या प्रमाणात फेकण्यात येत आहे. त्यामुळे शहरात कांदळवन, हिरवाई नष्ट होत चालली आहे. असाच प्रकार बेलापूर विभागात सुरू आहे. येथील गणपतशेठ तांडेल मैदानालगत मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. हा राडारोडा थेट येथील झाडांच्या बुंध्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे मैदानातील अनेक झाडे मृत पावली आहेत. तर उर्वरित झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे राडारोड्याचा भराव टाकून झाडांची कत्तल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
....................
गणपतशेठ तांडेल मैदानात जर डेब्रिजचा भराव टाकून झाडांची कत्तल केली जात असेल तर त्याठिकाणी पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
- सुनील कोठुले, सहाय्यक आयुक्त, परिमंडळ एक, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.