‘अमृत भारत’ स्थानकांचे लवकरच उद्घाटन
मुंबईतील चिंचपोकळी, माटुंगा, परळ, शहाड, वडाळ्याचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने ‘अमृत भारत’ योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील १२५ ‘अमृत भारत’ स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठवडाभरात उद्घाटन होणार आहे. यामध्ये मुंबईतील चिंचपोकळी, माटुंगा, परळ, शहाड आणि वडाळा या पाच स्थानकांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
‘अमृत भारत’ योजनेअंतर्तग मुंबई विभागातील एकूण १५ स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे. त्यातील माटुंगा, शहाड आणि चिंचपोकळी स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित स्थानकांची कामे ८० ते ८५ टक्के पूर्ण झाली असून, पुढील दोन-तीन महिन्यांत ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी प्रवाशांना नव्या रूपात रेल्वे स्थानकांचा अनुभव घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेद्वारे स्थानक परिसराचा कायापालट होत असून, यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रवेशद्वारांवर पोर्चची निर्मिती, फलाटांचे उन्नतीकरण, दर्शनी भागाचा बदल, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, लिफ्ट-एस्कलेटरची सुविधा, प्रतीक्षागृहांचे नूतनीकरण, फर्निचर बदल आणि १२ मीटर रुंद पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे.
---
तीन स्थानकांचे आधुनिकीकरण पूर्ण :
१. माटुंगा
- खर्च ः १७ कोटी
- बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण
- प्लॅटफॉर्म १/२वर नवे फ्लोअरिंग आणि सूचनाफलक
- कल्याण दिशेच्या बुकिंग कार्यालयात सुधारणा
- तिकीट खिडकीजवळ व्हर्टिकल गार्डन
---
२. शहाड
- खर्च ः आठ कोटी
- प्लॅटफॉर्म ३ वरील बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण
- स्वच्छतागृहांची सुधारणा
- दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वार
- वाहनतळ, रंगकाम आणि बगिच्यांची उभारणी
----
३. चिंचपोकळी
- खर्च ः ११ कोटी, दुसऱ्या टप्प्यात ४० कोटी
- बुकिंग कार्यालयातील अंतर्गत रचनेचे काम
- पादचारी पूल, नवे जिने
- रुळांलगतच्या भिंतीवर रंगकाम
- पूर्वेकडील पादचारी पुलाच्या प्रवेशद्वारालगत
- फायबरमिश्रित काचेच्या भिंतीची (फसाड) उभारणी
- प्लॅटफॉर्म रुफ प्लाझा दुसऱ्या टप्प्यात पूर्ण करणार
-----------
योजनेबाबत ....
- देशातील १,२७५ स्थानकांमध्ये सुधारणा सुरू
- महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा समावेश
- एकूण अंदाजे खर्च ः २५,००० कोटी
-------------
काम सुरू असलेली अन्य स्थानके
भायखळा, कुर्ला, विद्या विहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, दिवा, मुंब्रा, टिटवाळा, इगतपुरी, सॅण्डहर्स्ट रोड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.