तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाजारपेठ विविध साहित्याने सजली आहे. झेंडे, पताका, कुर्ती, फेटे, मफलर अशा विविध वस्तू बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. संपूर्ण बाजारपेठ निळ्या रंगांच्या वस्तूंनी उजळून निघाली आहे. झेंडे आणि बॅच यांची अधिक मागणी आहे. सोमवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे सर्वत्र तयारीस वेग आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तरुणांचा मोठमोठे झेंडे खरेदी करण्याकडे विशेष ओढा दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘जय भीम’ लिहिलेली रिबीन, कागदी, कापडी, प्लॅस्टिक पताका, आकाश कंदील, काठ्या यांचीही मागणी वाढली आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला तुर्भे जनता मार्केट येथील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. जयंतीनिमित्त लागणाऱ्या सर्व वस्तू याठिकाणी मिळत असल्याने दिवसभर खरेदीसाठी गर्दी दिसून आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वस्तूंच्या भावात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
---------------
रस्ते, चौकांत कमानी
लहान, मोठे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले झेंडे यांना अधिक मागणी आहे. सार्वजनिक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रस्ते, चौकांत झेंडे, पताका आणि कमानी उभारण्यासह विविध तयारीस वेग आला आहे. जयंती साजरी करण्यासाठी मंडप उभारणी, विद्युत रोषणाईची कामेदेखील रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.