मुंबई

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबाबत पनवेल महापालिकेचा गौरव

CD

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबाबत पनवेल महापालिकेचा गौरव
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पनवेल महापालिकेस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
आयुष्मान भारत डिजिटल ही भारताच्या आरोग्य क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाची सुरुवात आहे. या उपक्रमामुळे आरोग्यसेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि नागरिक केंद्रित होणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेने ठरावीक वेळेत सर्वप्रथम १०० टक्के नोंदणी केल्याबद्दल महापालिकेचा सन्मान करण्यात आला. केंद्र सरकारने आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी झेप घेत आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केले असून, यामार्फत प्रत्येक नागरिकाला एक अद्वितीय आभा आयडी (आरोग्य ओळख क्रमांक) दिला जात आहे. या योजनेचा उद्देश देशभरातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती एकत्र करून तिला डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे साठवणे आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत तयार केलेली आभा आयडी हा १४ अंकी युनिक ओळख क्रमांक आहे. या आयडीद्वारे नागरिक त्यांचे वैयक्तिक आरोग्य नोंदी एका क्लिकवर पाहू शकतात. यामुळे कागदपत्रे बाळगण्याची गरज राहत नाही आणि कोणत्याही रुग्णालयात पुन्हा तपासण्या करण्याची आवश्यकता कमी होते. या मिशनअंतर्गत पनवेल महापालिकेने सरकारी व खासगी रुग्णालयांची नोंदणी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांची अधिकृत माहिती अशा महत्त्वपूर्ण नोंदणीचे काम केले आहे. उपायुक्त डॉ. वैभव विधाते व मुख्य‍ वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठरावीक वेळेत संपूर्ण राज्यामध्ये सर्वप्रथम या नोंदणीचे काम पूर्ण केल्याने त्‍यांचा सन्‍मान करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT