मुंबई

भाजपचा ठाकरे गटाला धक्का

CD

भाजपचा ठाकरे गटाला धक्का
मिशन पालिकेच्या दिशेने पाऊल; माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने सुरू केलेल्या ‘मिशनला’ आणखी बळ देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. घोडबंदर पट्टा मजबूत करण्यासाठी भाजपने एकेकाळी जायंट किलर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांना पक्षप्रवेश दिला आहे. शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्यानंतरही लॉरेन्स डिसोझा यांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. माजिवडा प्रभागातील पॅनलमध्ये ठाकरे गटाचे भवितव्य संपुष्टात आल्याने त्यांनी शिंदे गटात जाण्याऐवजी भविष्याचा वेध घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे माजिवड्यात भाजपची ताकद वाढली आहे.

ठाणे पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यासाठी विविध पक्षातील माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना ठाकरे गटातील नाराज माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा सुरू केला आहे. ठाणे महापालिकेत २०१२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर माजिवडा गाव परिसरातून लॉरेन्स डिसोझा निवडून आले होते. त्या वेळी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवलेल्या देवराम भोईर यांचा त्यांनी पराभव केला होता. देवराम भोईर यांनी राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच पराभव यानिमित्ताने पाहिला होता. त्यामुळे डिसोझा यांची ओळख जयंट किलर अशी झाली होती, पण जात पडताळणी तक्रारीमुळे ते पुढे अडचणीत आले. आता पुन्हा ते निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. माजिवड्यात डिसोझा यांचा स्वतःचा मतदार आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट झाल्यानंतरही त्यांनी शिंदे गटात जाण्याऐवजी ठाकरे गटासाठी काम करणे पसंद केले, पण या प्रभागात आता भाजपचा मतदार वाढला असल्याने त्यांनी भाजपचा हात पकडला असल्याचे समजते.

त्यांच्याबरोबर त्यांची कन्या स्टेफनी डिसोझा यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख रामेश्वर बचाटे, आंबेडकरी चळवळीतील महेश चव्हाण यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. ठाणे शहरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार पक्षप्रवेश सोहळा पार पडला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या वेळी माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, ओवळा-माजिवडा मंडल अध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT