मुंबई

आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या

CD

आरोपी विशाल गवळीची
तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरण

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : चार महिन्यांपूर्वी कल्याण पूर्वेत राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहातील शौचालयात टॉवेलने गळफास घेऊन रविवारी (ता. १३) पहाटे आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विशालचे कुटुंबीय आणि वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करून चौकशीची मागणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली आहे.

आरोपी विशाल गवळी याने डिसेंबरमध्ये कल्याण पूर्वेतील १३ वर्षांच्या मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर विशालने या मुलीची घरात हत्या करून पत्नी साक्षी गवळी हिच्या मदतीने तिचा मृतदेह कल्याण-भिवंडी मार्गावर बापगाव हद्दीत फेकून दिला होता. त्यानंतर विशालने बुलढाणा जिह्यातील पत्नीच्या गावी शेगाव येथे पलायन केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव येथून त्याला अटक केली होती. तीन महिने तपास करून आरोपी गवळी याने गुह्यात वापरलेले हत्यार, गांधारे नदीत फेकून दिलेली पिशवी आणि इतर वस्तू हस्तगत केल्या होत्या. सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी त्याला तळोजा येथील कारागृहात ठेवले होते. विशालने रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शौचालयात टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास इतर कैदी शौचालयात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी तळोजा कारागृहात धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
----------------------
विशाल गवळी याला आत्महत्या करायची असती, तर त्याने यापूर्वीच आत्महत्या केली असती. टॉवेलने गळफास बसू शकत नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे. कारागृह प्रशासन किंवा पोलिस यापैकी कोणीही गवळी याला मारले आहे किंवा त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सखोल तपास होणे आवश्यक आहे. सीसीटीव्हीची तपासणी करणे गरजेचे आहे.
- ॲड. संजय धनके, विशालचे वकील
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT