सुळका डोंगरावर भाविकाचा घसरून मृत्यू
महालक्ष्मी यात्रोत्सवातील घटना
कासा, ता. १३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या भव्य यात्रोत्सवाला शनिवारी (ता. १२) सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुळका डोंगरावर एका भाविकाचा घसरून मृत्यू झाल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
यात्रेत शनिवारी मध्यरात्री पारंपरिक ध्वजारोहण विधी पार पडला. रात्री १२ वाजता महालक्ष्मी मंदिरातून पूजा-अर्चा करून पुजाऱ्यांच्या हस्ते ध्वज सुळका डोंगराच्या शिखरावर नेण्यात आला. या वेळी स्वयंसेवक, पोलिस आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. रविवारी पहाटे काही अति उत्साही भाविकांनी सुळका डोंगराच्या टोकावर जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुरतहून आलेले मेरीक कन्हैयालाल कांचवाला (वय ३८) हेही सहभागी होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आणखी उंच शिखर चढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पाय घसरल्याने ते खोल दरीत पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून भाविकांना पर्वतरांगेत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक मार्गदर्शकांच्या मदतीनेच डोंगरावर चढावे, असा सल्ला देण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वीही एका भाविकाचा पायऱ्या चढताना दम लागून मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.