मुंबई

समुद्रात अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

CD

समुद्रात अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका
पिरवाडीत जीवघेणा थरार

उरण, ता. १३ (वार्ताहर) ः उरण तालुक्यातील नागाव-पिरवाडी किनारपट्टीजवळील समुद्राच्या मध्यभागी चार तरुण भरतीच्या पाण्यात अडकल्याने पाण्याचा वेग आणि खडकाळ रचना यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सागररक्षक दलाने तत्काळ बोट घेऊन समुद्रात प्रवेश करून चार तरुणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.
बचावलेल्या तरुणांची नावे शैलेश काटे (वय २२), सुमेध मिश्रा (वय २४), सागर नावणे (वय २४) आणि सुमेध अवस्कर (वय २२) अशी आहेत. हे सर्व जण नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी आहेत. सागररक्षक दलाच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि चार तरुणांचे प्राण वाचले. बचावकार्याच्या वेळी समुद्राला उधाण होते, लाटा जोरात धडकत होत्या आणि संपूर्ण परिसर खडकाळ असल्यामुळे मदतकार्य करणे अत्यंत धोकादायक होते. सागररक्षक दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि सागररक्षक दलाने पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आणि अधिकृत मार्गदर्शनाशिवाय खोल समुद्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT