मुंबई

चार अल्पवयीन मुलांनी मित्राला केले ब्लॅकमेल

CD

चार अल्पवयीन मुलांनी मित्राला केले ब्लॅकमेल
९.५९ लाखांचे दागिने लुबाडले

उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : शहरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. केवळ सिगारेट ओढतानाची व्हिडिओ क्लिप वापरून चार अल्पवयीन मित्रांनी आपल्या एका मित्राला सातत्याने ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून तब्बल नऊ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने उकळले. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी शनिवारी (ता. १२) उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पीडित मुलगा उल्हासनगर कॅम्प एक येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा असून, तो एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेतो. काही काळापूर्वी त्या क्लासमध्येच त्याच्या चार मित्रांनी त्याचा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ शूट केला होता. नंतर या चौघांनी त्याच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. १४ फेब्रुवारी २०२५ ते १३ मार्च २०२५ या कालावधीत या चार मित्रांनी घरच्यांना व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत पीडित मुलाकडून वेळोवेळी घरातील सोन्याचे दागिने मिळविले. इतकेच नव्हे, तर त्यांनी ती क्लिप त्याच्या पालकांना आणि पोलिसांना दाखवण्याची धमकी दिली. या काळात घरातून सोन्याचे दागिने गायब होत असल्याने पीडिताच्या पालकांनी याबाबत विचारणा केल्यावर घाबरलेल्या मुलाने पालकांना सत्य सांगितले. त्यांनी तत्काळ उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक यादव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT