मुंबई

राजकीय पदाधिकाऱ्याला खंडणीप्रकरणी अटक

CD

राजकीय पदाधिकाऱ्याला खंडणीप्रकरणी अटक

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : कोपरखैरणेतील मिठाईच्या दुकान मालकाला धमकावून त्याच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागून ३० हजार रुपये उकळणाऱ्या किशोर लोंढे या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली रविवारी (ता. १३) अटक केली.
या प्रकरणातील तक्रारदार जगदीश चौधरी यांचे व त्याच्या कुटुंबीयांचे कोपरखैरणे, घणसोली, वाशी आणि सानपाडा या ठिकाणी मिठाईचे दुकान आहे. अतिरिक्त जागेवर अतिक्रमण करून मिठाईचा व्यवसाय करण्यात येत असल्याची तक्रार किशोर लोंढे याने काही दिवसांपूर्वी महापालिकेकडे केली होती. त्यावरून दोघांची भेट झाली होती. महापालिकेकडे तक्रार करून दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची धमकी दिली. दुकान कायदेशीर चालवण्यात येत असल्याचे सांगितल्यावर किशोर लोंढे याने दुकानात निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जात असल्याचे सांगून त्याबाबत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व तक्रारी थांबविण्यासाठी दर महिना १५ हजार रुपये हप्ता व सध्या गुडलक म्हणून तीन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ८० रुपये देण्यास चौधरी याला बजावल्यानंतर चौधरी यांनी ९ एप्रिलला कोपरखैरणेमध्ये २० हजार रुपये, तर दुसऱ्या दिवशी १० हजारांची रक्कम किशोर लोंढे याला दिली. त्यानंतर किशोर लोंढे याने उर्वरित खंडणीची रक्कम एकत्र देण्याकरिता त्याला धमकावण्यास सुरुवात केल्याने अखेर चौधरी यांनी शनिवारी (ता. १२) कोपरखैरणे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी किशोर लोंढे याला रविवारी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT