कर्जत दहिवलीत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न
कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः शहरालगत असलेल्या दहिवली येथील विनायक अंगण या इमारतीत शनिवारी (ता. १२) मध्यरात्री साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घरफोडीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. दरवाजाचे कुलूप तोडत असताना घरातील लोक जागे झाले आणि चोरटे पळून गेले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सुनील पाटील यांच्या घराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे; मात्र घरमालक घरातच असल्याने आणि बाहेर सीसीटीव्ही असल्याचे चोरट्यांचा डाव फसला. त्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असून यामध्ये तिघे जण असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात दरवाजा तोडण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी वेगवेगळी हत्यारेदेखील असल्याचे दिसत आहेत. त्यांनी तोंड झाकल्यामुळे चेहरा ओळखता येत नाही. घरफोडी करीत असताना चोरट्यांनी अत्यंत शिताफीने बाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून ठेवली होती, जेणेकरून अन्य घरांतील कोणी जागे झाले तरी ते बाहेर येऊ शकणार नाहीत आणि चोरट्यांना पळून जाण्यास वेळ मिळेल, अशी योजना त्यांनी आखली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.