मुंबई

वाहनतळ ठेकेदाराचा पालिकेच्या रस्त्यावर कब्जा

CD

अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये वाहनतळ ठेकेदाराने चक्क पालिकेचा अर्धा रस्ता अडवून त्यावर पार्किंग सुरू केली आहे. मात्र, आजवर बाजार विभाग किंवा अतिक्रमण विभागाने या अनधिकृत पार्किंगकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ठेकेदाराचे उखळ मात्र पांढरे होत आहेत.
अंबरनाथ पूर्वेतील स्टेट बँकेसमोर अंबरनाथ नगरपालिकेचे वाहनतळ आहे. हे वाहनतळ रायन इंटरप्राईजेस नावाच्या ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. पार्किंगला चारही बाजूंना कुंपण आहे. तरी वाहनतळाबाहेरील विकास आराखड्यातील रस्त्यावर ठेकेदाराने कुंपण घालून गाड्या लावायला सुरुवात केली आहे. असा अर्धा रस्ता अडवून ठेकेदाराने पार्किंग सेवा सुरू केली आहे. या अनधिकृत पार्किंगकडे आजवर बाजार विभाग किंवा अतिक्रमण विभाग यापैकी कुणाचेही लक्ष नाही. रस्त्यावरील या अनधिकृत वाहनतळातून ठेकेदार एका गाडीच्या २० रुपयांप्रमाणे ४०० गाड्यांचे दिवसाला ८ हजार रुपये कमवत आहे. पालिकेला मात्र याचा कोणताही हिशेब दिला जात नाही. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनधिकृत पार्किंगवर अंबरनाथ नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वाहतूक विभागाला संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, आता पालिकेनेच जबाबदारी झटकल्याने कारवाई होणार की नाही? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हा ठेका रायन एंटरप्राइजेस नावाच्या ठेकेदाराला देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जर पार्किंगमुळे रस्ता अडला जात असेल, तर मात्र तो वाहतूक विभागाचा विषय आहे. वाहतूक विभागाने यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
- नरेंद्र संखे, अधिकारी, अतिक्रमण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT