मुंबई

मातीच्या चुलीला गृहिणींची पसंती

CD

टोकावडे, ता. १५ (बातमीदार)ः आधुनिक युगातही ग्रामीण भागात मातीच्या चुलीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. आधुनिकीकरणामुळे स्वयंपाकघरात विविध साधने आली असली तरी ग्रामीण भागात मात्र मातीच्या चुलीचे महत्त्व आजही कायम आहे.
ग्रामीण भागातील चुलीवरचे जेवण अनेकांना भुरळ घालते. त्यामु‍ळेच स्वादिष्ट जेवण जेवण्यासाठी ग्रामीण भागातील खानावळीमध्ये अनेक जण हजेरी लावतात. गावागावात आजही चुलीवरच जेवण बनवले जात असल्याने अनेक गृहिणी मातीची चूल खरेदी करताना दिसतात. पारंपरिक स्वयंपाक पद्धतीमध्ये चुलीला खूपच महत्त्व आहे. त्यात आता एका सिलिंडरसाठी ८५८ रुपये मोजावे लागत असल्याने ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी पुन्हा पारंपरिक मातीच्या चुलीचा वापर वाढला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजही अनेक ग्रामीण भागात कुभांर व्यावसायिक मातीच्या चूल बनवण्यात मग्न झाले आहेत.
-------------------------------------------
२५० ते ३०० रुपयांना विक्री
चिकन वाट माती आणि ती दोन ते तीन दिवस पाण्यात भिजवावी लागते. त्यानंतर भिजलेली माती योग्य प्रकारे मळून घ्यावी लागते. एक चूल बनविण्यासाठी माती भिजवणे, मळणे, कुंभ लावणे आणि नंतर कोरणे यासाठी दोन ते तीन दिवस कालावधी लागतो. एका चुलीची किंमत २५० ते ३०० रुपये आहे. आजही अनेक गृहिणी मातीची चूल मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे विक्रेते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT