मुंबई

पालिका शौचालयांचे अवाजवी दर

CD

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात शौचालयासारख्या मूलभूत गरजेसाठीही नागरिकांना निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शहरातील कामगार आणि गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचा आरोप केला जात आहे.
भिवंडी शहर हे कामगारांचे शहर असून येथे मोठ्या संख्येने झोपडपट्टी आहे. शहरातील बहुतांश शौचालयांचे ठेके निर्मल फाउंडेशन नावाच्या संस्थेला देण्यात आले आहे. याशिवाय बहुजन विकास संस्था आणि आदर्श सामाजिक सेवा संस्थाही अनेक शौचालये चालवत आहेत, पण त्यासाठीचा करार २०१०-१२ च्या जुन्या अटींवर आधारित असून, कंत्राटदारांना सुविधेसाठी प्रतिव्यक्ती १ ते २ रुपये आकारण्याची परवानगी आहे, पण ठेकेदार ३ ते ५ रुपये वसूल करत असून, शौचालय विभागाचा ठेका मिळवण्यासाठी लाखो रुपयांची बोली लावली जात असल्यानेच अशा प्रकारे मनमानी वसुली करत असल्याचा आरोप होत आहे.
-------------------------------------------------
पालिकेकडून यंत्रणा तैनात
शहरातील झोपडपट्टी भाग आणि यंत्रमाग कारखाने या सह शहरात कार्यरत असलेल्या एकूण ३९२ सार्वजनिकपैकी २०२ शौचालये विविध संस्था आणि ठेकेदारांकडून नियंत्रित केली जातात, तर उर्वरित १९० शौचालये महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून चालवली जातात, तर व्यवस्थापन, तपासणीसाठी २७८ सफाई कामगार, पाच चालक, २५ लिपिक यांच्यासह मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
------------------------------------
‘हेल्पलाइन क्रमांक जारी करा’
सार्वजनिक शौचालये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून तत्काळ आणि प्रभावीपणे स्वच्छ करावीत. तसेच प्रत्येक ठिकाणी निर्धारित सेवा शुल्काची स्पष्ट माहिती असलेला फलक लावावा. तसेच कंत्राटदारांकडून होणाऱ्या बेकायदेशीर वसुलीवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

Pune Latest News: पुण्यात अनधिकृत इमारतींवर हातोडा; वाघोलीत चार ते पाच मजल्यांच्या इमारती जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT