मुंबई

अग्निशमन हुतात्म्यांचा सन्मान राखला पाहिजे

CD

नेरूळ, ता. १५ (बातमीदार) : अग्निशमनाचे काम करीत असताना आपल्या प्राणांचे बलिदान दोणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान राखला पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीची खबरदारी घेण्याचा संदेश प्रत्यक्षात अंगीकारण्यासाठी आजचा अग्निशमन सेवादिन महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले. त्यांनी हुतात्मा‌ जवानांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील अग्निशमन केंद्रात आयोजित कार्यक्रमप्रसंगी आयुक्तांनी उपस्थित अग्निशमन जवानांशी संवाद साधला. नवी मुंबई महापालिकेच्या पाच अग्निशमन केंद्रांद्वारे शहर सुरक्षिततेची जबाबदारी आपले अग्निशमन दल पार पाडत आहे. आपत्तीनंतर आपत्ती निवारणाचे कार्य तत्परतेने करण्यासोबतच आपत्ती उद्‍भवू नये, याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे उपक्रम प्रात्यक्षिकांसह राबविण्यावर भर द्यावा, असे आयुक्तांनी सांगितले. त्यासाठी मोठ्या सोसायट्या, संस्था, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, उद्योगसमूह, मॉल्स अशा वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे जनजागृतीपर उपक्रम राबवावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. या वेळी मुख्य अग्निशमन अधिकारी तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, केंद्र अधिकारी व्ही. डी. कोळी, पी. एम. गोळे, आर. जी. चौधरी, आर. आर. कोकाटे, एस. आर. चन्ने यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
---------------
एकही जीवितहानी होणार नाही हेच लक्ष्य
‘संघटीत व्हा, अग्नि सुरक्षित भारताला प्रज्वलित करा’ हे या वर्षी अग्निशमन सेवादिनाकरिता केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले घोषवाक्य आहे. त्या अनुषंगाने एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी वित्तहानी व एकही जीवितहानी नाही, हे लक्ष्य ठेवून काम करावे, असे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक वाहने असून, आगामी काळात पुनर्विकासाच्या माध्यमातून उंच इमारती मोठ्या संख्येने उभ्या राहणार असल्याने नवी मुंबईची स्कायलाइन बदलणार आहे, हे लक्षात घेत जवानांना प्रशिक्षित करावे, असे त्यांनी सूचित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT