रेल्वे यार्ड रिमोल्डिंग प्रकल्पातील झाडांची उपेक्षा
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण पू्र्वेतील रेल्वे यार्ड परिसरातील पुनर्रोपित केलेली झाडे सुकून गेली आहेत. या झाडांना नवसंजीवनी मिळावी, यासाठी पूर्वेतील सामाजिक पदाधिकारी, नागरिकांच्या पुढाकाराने दोन दिवसांपासून टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहेत.
कल्याण पूर्वेत रेल्वे यार्डचा रिमोल्डिंग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेच्या हद्दीतील (कल्याण पूर्व) शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली, तर काही जुनी झाडे अन्य ठिकाणी स्थलांतरित करून पुनर्रोपित केली. यातील स्थलांतरित व अन्यत्र पुनर्रोपित केलेल्या सुमारे १५० जुन्या झाडांचे संवर्धनासाठी रेल्वेकडून काही लाखो रुपये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागाला देण्यात आले, परंतु गेल्या काही महिन्यांपासून संबंधित यंत्रणेने, ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने ही झाडे सुकली आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. धनंजय जोगदंड, विजय भोसले, वर्षा कळके, जितेंद्र शिर्के यांनी केला आहे.
झाडे जगावी यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरणाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता; मात्र महापालिका प्रशासनाला काहीच फरक पडलेला नाही, अशी खंत या सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. एकीकडे राजकीय नेते झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन जनतेला करण्यासाठी कोटी रुपये खर्च करत असतात; मात्र आहे ती झाडे पैसे घेऊन मारून टाका, असा पवित्रा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.