मुंबई

कामणवासियांचा पाण्याचा प्रश्न सुटणार

CD

विरार, ता. १५ (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या कामणवासीयांनी केलेल्या आंदोलनानंतर ही समस्या मार्गी लागल्याचे पालिकेच्या आश्वासनानंतर समोर आले. वसई पूर्वेकडील नागरिकांनी पालिकेच्या प्रभाग समिती जी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनापुढे पालिका प्रशासन नमले असून, त्यांनी २८ एप्रिलपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले. अखेर कामण व पूर्व पट्टीतील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सूर्या प्रकल्प, पेल्हार, उसगाव, एमएमआरडीए अमृत योजना अशा विविध योजनांतून प्रतिदिन ३७० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. पालिकेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात अजूनही पाणी पोहोचले नसल्याने या नागरिकांना संघर्ष करावा लागतो. प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या कामण, देवदळ, कोल्ही, चिंचोटी, सातिवाली, गिदराई पाडा या भागात अधिकच पाणीटंचाई जाणवते.

पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सरकारने योजना राबविल्या, मात्र त्या कार्यान्वित न झाल्याने या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी प्रभाग समिती जी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आंदोलन केले. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले होते. यात अमृत १ अंतर्गत वसई फाटा ते राजीवलीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. २७ ठिकाणी बोअरवेल, टँकरद्वारे पाणीपुरवठा, कामण येथील लघुपाट बंधारे योजना, दलित वस्ती योजना या दोन्ही योजनांची पाहणी करून त्या कार्यान्वित केल्या जातील, असे आश्वासन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

Mutual Fund: स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप कोणता म्यूचुअल फंड देतो जास्त रिटर्न? आकडेवारी काय सांगते

कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा... म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं उत्तर; म्हणाल्या, तुमचा फोकस का...

धक्कादायक! झोमॅटोवरून बिर्याणी मागवली; अन्नात कुत्र्याचा पाय सापडला अन्... संतापजनक व्हायरल व्हिडिओ समोर

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

SCROLL FOR NEXT