मुंबई

वीज बिल वेळेत भरण्याचे महावितरणचे आवाहन

CD

वीजबिल वेळेत भरण्याचे महावितरणचे आवाहन
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मार्च २०२५ मध्ये ५४.८२ कोटींची वीजदेयके ग्राहकांना देण्यात आली होती. त्यामधील ५३.६९ कोटी रुपयाची वसुली झाली असून, उर्वरित १.१३ कोटीची बिले प्रलंबित आहेत. ग्राहकांनी वेळेत बिले भरणे आवश्यक आहे. अन्यथा नाइलाजास्तव ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करावा लागेल, असा इशारा महावितरणने दिला आहे. मुलुंडमध्ये वीजग्राहकांची तब्बल १.१३ कोटी रुपयांची एकूण थकबाकी (मागील व चालू देयकांची) आहे.
मुलुंडमध्ये कार्यकारी अभियंता राजेश थूल यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत असून, वीजचोरीची प्रकरणेही आढळून आली आहेत. त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल, असे मुलुंड पूर्व महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक जाधव यांनी सांगितले. मुलुंडमध्ये लोडशेडिंग नसल्याचा दावा महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश थूल यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

SCROLL FOR NEXT