मुंबई

शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे ठोकू

CD

शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे ठोकू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : शास्त्रीनगर रुग्णालयाबाबतीत अनेक रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नवजात बालकांना इतरत्र ॲडमिट करणे, अतिदक्षता विभाग नसल्याने गर्भवतींना सायन, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, रुक्मिणीबाई रुग्णालय अशा ठिकाणी स्थलांतरित करण्याचे पत्र शास्त्रीनगर रुग्णालयामार्फत दिले जाते. त्यामुळे येत्या १५ दिवसांत रुग्णांना होणारा त्रास कमी झाला नाही तर या रुग्णालयाला टाळे लावून रुग्णालय बंद करू, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाला दिला.

केडीएमसीच्या डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलांना योग्यरीत्या उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. तसेच या महिलांना ठाणे, मुंबईच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचे पत्र दिले जाते. तसेच नवजात बालकांना इतरत्र ॲडमिट करण्यास सांगितले जाते. नाइलाजास्तव रुग्णाची परिस्थिती लक्षात घेता त्यांना परवडत नसतानादेखील नातेवाईक खासगी रुग्णालयात रुग्णाला दाखल करतात. यामुळे अतिरिक्त भुर्दंड व नाहक मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो.

सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या या त्रासामुळे मंगळवारी (ता. १५) मनसेच्या शिष्टमंडळाने शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले. या वेळी जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, राहुल कामत, श्रीकांत वारिंगे, कोमल पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देत रुग्णालयातील सर्व सेवा-सुविधांची माहिती पुढील आठ दिवसांत देण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांत आपली वैद्यकीय यंत्रणा सुरळीतपणे चालली नाही तर या रुग्णालयाला टाळे लावून रुग्णालय बंद करू, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT