मुंबई

सीबीएसई शाळेसाठी १,३०० अर्ज

CD

वाशी, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नर्सरी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले होते. या शाळांमध्ये एकूण ४१५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या ४१५ जागांसाठी १,३०० अर्ज आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने या अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पालिका हद्दीत एकूण तीन सीबीएसई बोर्डाच्या शाळा चालविल्या जातात. एक सीवूड्स विभागात, दुसरी कोपरखैरणेमध्ये आणि तिसरी शाळा ही नेरूळ सारसोळेमध्ये सुरू करण्यात आली आहे. या शाळांमधे मोफत प्रवेशाबरोबर, मोफत शैक्षणिक साहित्य आणि मोफत शिक्षण दिले जात आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, शिवाय या शाळांचा शैक्षणिक दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे दरवर्षी या शाळांना पसंती वाढत आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे; मात्र शाळेत प्रवेश मर्यादित आहे. या शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जानुसार त्यांची छाननी केली जात आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची पडताळणी, चौकशी केली जात आहे. ती पूर्ण झाली की प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांची यादी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

'स्वामींची इच्छा' हे वाक्य लोकांना फार आवडलं! 'सनई चौघडे मालिकेबद्दल बोलताना राज हंचनाळे म्हणाला...'शुटिंगवेळी मला...'

SCROLL FOR NEXT